भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अशोक शेजुल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार प्रकाश सोळंके अडचणीत आले आहेत. आता याप्रकरणी प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवाणींसह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक काय आहे प्रकरण?
भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकेंसह विविध संस्थांमधील अनियमिततेबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच पोलिसांच्या माहितीनुसार, शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्सटाईल पार्क, माजलगाव सहकारी साखर कारखान्याची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती. यामुळे शेजुळ यांच्या हल्ला करण्यात आला.
मंगळवारी, धुलिवंदनाच्या दिवशी अशोक शेजुळ दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या मोटरसायकलवरील पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी तू लय प्रकाश सोळंकेंच्या तक्रारी करतोस का? असे म्हणत शेजुळ यांच्यावर रॉड आणि धारधार शस्त्राच्या सहाय्याने हल्ला चढवला. माहितीनुसार, माजलगाव शहरातील शाहूनगर येथे शेजुळ जात होते.
या हल्ल्यात अशोक शेजुळ यांच्या दोन्ही पायांना, दोन्ही हातांना आणि कंबरेत दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी तक्रार दाखल केली असून राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक)
Join Our WhatsApp Community