भाजपाला आव्हान देण्यासाठी राज्यभर होणार महाविकास आघाडीच्या सभा

150
शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता पालट घडवून आणणाऱ्या भाजपने आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत पुढचे राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने उद्धव ठाकरे यांचा गट कमकुवत झाला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कसब्याच्या पोट निवडणुकीत भाजपचा महाविकास आघाडीने पराभव केल्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आता राज्यभर महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत, तसा निर्णय बुधवारी, ८ मार्च रोजी विधानभवनात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी देखील कामाला लागली आहे. महाविकास आघाडी आता सरकार विरोधात आक्रमक भूमिकेत आहे. एप्रिल ते मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार आहे. या सभांमध्ये मविआचे स्वत: उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. या संयुक्त सभेपूर्वी महाविकास आघाडीचा १५ मार्चला मेळावा होणार आहे. विधिमंडळात अजित पवार यांच्या दालनात उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अंबादास दानवे आणि इतर नेत्यांची आज संयुक्त बैठक पार पडली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.