विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार

223

मुंबईतील विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा सध्या सिंहासनाधिष्ठीत स्वरूपाचा पुतळा मोठा बसवण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.

सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर पुतळा बदलण्याची मागणी करण्यात येत होती. आता हा पुतळा बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या आमदारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. अर्थसंकल्पाच्या दिवशी सत्ताधाऱ्यांकडून अभिवादन करण्यात येते. सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. मात्र महाराज बसलेले सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता.

(हेही वाचा २०२४ लोकसभा निवडणुकीची भाजपची ‘ब्लू प्रिंट’ तयार; मोदींच्या १०० सभा, तर मोठ्या प्रकल्पांची होणार घोषणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.