शेतक-यांच्या मुद्यावरुन विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कांदाप्रश्न, अवकाळी पाऊस, नाफेडकडून पिकांची खरेदी यावरुन विरोधकांनी आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवाीचे नेते छगन भुजबळ यांनी शेतक-यांना मदत करण्यावरुन सरकारला घेरले. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि विरोधकांनी सभात्याग केला आहे.
मुख्यमंत्री संतापले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. तुमच्यासारखे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली नाहीत. आम्ही 12 हजार कोटी रुपये दिले. तुम्ही 50 हजार मदत केली. शेतक-यांना तुम्ही नाही तर आम्ही मदत केली. संकटात सापडलेल्या शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
( हेही वाचा: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक )
विरोधकांचे सत्ताधा-यांविरोधात आंदोलन
अवकाळी पावसाने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. नुकसान भरपाई जाहीर करण्याच्या मागणीसाठी विधानभवनाच्या पाय-यांवर विरोधकांनी सकाळी आंदोलन केले. बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांनी दिल्या.
Join Our WhatsApp Community