राज्यात देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प २०२३-२०२४ अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. तेव्हा त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.
याअंतर्गत देशी गोवंशाची अधिकाधिक उत्पत्ती करण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. तसेच अहमदनगर येथे नवीन पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच दूध उत्पादनासाठीही विशेष संशोधन करण्यात येणार आहे. राज्यात देशी गोवंशाची संख्या घटत आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने या अर्थसंकल्पात थेट गोवंश आयोगाची स्थापना केली आहे.
(हेही वाचा Maharashtra Budget Session : देवेंद्र फडणवीस यांचे पहिले बजेट; पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्पाचे वाचन)
काय करणार आयोग?
- आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार
- देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ
- विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये