Maharashtra budget 2023-2024 : नदीजोड प्रकल्पांतर्गत अवर्षण भाग होणार सुजलाम सुफलाम

299

राज्यात काही भाग कायम अवर्षणग्रस्त असतो, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होत असते. त्यामुळे राज्यातील हा भेद कमी करण्यासाठी राज्य सरकारने नदी जोड प्रकल्पावर जोर दिला आहे. यासाठी सरकारने राज्यातील विविध नद्या जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अवर्षण भागात सिंचन क्षमता वाढणार आहे. 

कोणत्या योजना असणार नदी जोड प्रकल्पात? 

  • दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
  • नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार
  • मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
  • मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
  • वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, 
    अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ
  • तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
  • पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
  • कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ
  • या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता

(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.