Maharashtra Budget Session : शेतकर्‍यांना आता १२ हजारांचा सन्माननिधी! कृषी क्षेत्रासाठी फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा

140

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्रासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, महाकृषीविकास अभियान, एक रुपयात पीक विमा योजना आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त ६ हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. कृषी क्षेत्राला यंदाच्या बजेटमधून काय मिळाले जाणून घेऊया…

( हेही वाचा : Maharashtra budget 2023-2024 : नदीजोड प्रकल्पांतर्गत अवर्षण भाग होणार सुजलाम सुफलाम )

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी

– प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
– केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
– 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता, केवळ 1 रुपयांत पीकविमा

– आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून
– आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
– शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
– 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

– 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार
– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
– 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

– राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
– पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
– एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
– 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

– मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
– आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
– मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर
– या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

– 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
– काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
– उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
– कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
– 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
– अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

– नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
– 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
– 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
– डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
– 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र, सोलापुरात स्थापन करणार

– आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
– 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
– सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार

नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र

– नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
– अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
– या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
– नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद

शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी,थेट रोखीने आर्थिक मदत!

– विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
– प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या, शेतकर्‍यांना निवारा-भोजन

– कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा
– शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
– जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.