उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प २०२३-२४ (Maharashtra Budget 2023) विधिमंडळात सादर केला. देशाच्या अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून पंचामृत ध्येयांवर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पुण्यातील बहुचर्चित रिंगरोड प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्पाबाबतची ही घोषणा आहे.
अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोडचे काम याचवर्षी पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले. या रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात दीड हजार कोटींची तरतूद केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान मेट्रो प्रकल्पांसाठी ३९ हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून पुणे मेट्रोची ८ हजार ३१३ कोटींची कामे प्रगतीपथावर आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो हे अन्य नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Maharashtra Budget 2023-24: शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून मुंबईसाठी काय-काय?)
Join Our WhatsApp Community