राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचे फुलोरे आणि चुनावी जुमला असल्याचे म्हणत सडकून टीका केली आहे. मात्र याच काळात १४ मार्चला सरकार कोसळणार असल्याची भीती असल्याने अर्थसंकल्पात निव्वळ घोषणा करण्यात आल्या आहे. आणि विधानपरिषद आणि पोटनिवडणुकीत झालेला परभव पाहता नागरिकांना खुश करण्यासाठी फक्त घोषणा करण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले. त्यामध्ये अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री शब्द बदलून पंचामृत हा शब्द वापरला यावरूनही टीका केली आहे.
अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा पाहून सरकार १४ मार्चला कोसळणार असल्याचे म्हटले असून राज्य कर्जबाजारी होण्याच्या दिशेने जाणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच काय तर अजित पवार यांनी सरकार अल्पकाळ रहाणार असल्याचा दावा केला आहे. खरेतर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्याचा संदर्भ देऊन १४ मार्चला सरकार कोसळणार असल्याचा अंदाज आल्याने हा अर्थसंकल्प सादर केल्याचे अजित पवार यांनी म्हटले. सरकारच्या विरोधात निकाल येणार असल्याचा दावा करत अजित पवार यांनी सरकारचे भविष्यच कथन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात पुस्तक लिहिले होते, त्यामध्ये त्यांनी अर्थसंकल्प कसा तयार करायचा हे सांगितले होते, मात्र तो कसा वाचायचा हे सांगितले नव्हते, ते सांगायला पाहिजे होते असे म्हणत अजित पवार यांनी सडकून टीका देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पावर केली आहे.
(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन)
Join Our WhatsApp Community