Maharashtra budget 2023 : सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

136

राज्यातील अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना भरभरून दिले, तसे त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठीही भरघोस तरतूद केली. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची घोषणा केली. तसेच शिक्षण सेवकांच्या पगारातही घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती १ हजार रुपयावरून ५ हजार रुपयाने वाढ करण्यात आली, इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत १५०० वरुन ७५०० रुपये वाढ करण्यात आली. यावेळी शिक्षणसेवकांच्या मानधनात १० हजार रुपयाने वाढ करण्यात आली. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांच्या मानधनात ६ हजारावरुन १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात ८ हजारावरून १८ हजार रुपये वाढ करण्यात आली. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात ९ हजारावरुन २० हजार रुपये वाढ करण्यात आली.

वैद्यकीय महाविद्यालये बांधणार

राज्यात सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथे १४ वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात येणार आहे.

(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.