राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान अपमानजनक आणि असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा आरोप भाजप खासदारांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधींवर करत त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीनुसार राहुल गांधींना आज, शुक्रवारी विशेषाधिकार समितीसमोर हजेरी लावावी लागणार आहे.
नक्की काय घडले होते?
अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू होती. त्यावेळेस राहुल गांधींनी जे भाषण केले. त्या भाषणावर भाजप आमदारांनी आक्षेप घेतला आहे. त्या संपूर्ण भाषणात उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित राहुल गांधींनी काही वक्तव्य केली होती. या वक्तव्यांना कुठलाही आधार नाही आहे, म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली आहे.
राहुल गांधींनी काय केला आरोप?
ज्या, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले आहेत, त्या, त्या ठिकाणी पाठोपाठ उद्याोगपती गौतम अदानी यांना तिथल्या महत्त्वाच्या गोष्टींची कंत्राटे संबंधित देशातील सरकारने दिली आहेत. त्यामुळे हे भारताचे परराष्ट्र धोरण आहे का? किती वेळेला पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ अदानी इतर देशांमध्ये गेले आहेत? अशा प्रकारचे प्रश्न सभागृहात राहुल गांधींनी उपस्थित केले होते.
राहुल गांधींचे हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, त्यामागे कोणतेही तथ्य नाही. जेव्हा सभागृहात असे आरोप केले जातात, तेव्हा त्या आरोपासंबंधित ठोस आणि सत्यता पडताळणारी कागदपत्रे द्यावी लागतात. भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, आरोपासंबंधित सर्व कागदपत्रे पटलावरती ठेवणार आहे. पण अद्यापही याचे कागदपत्रे पटलावरती ठेवली नसल्याचा नसल्याचा दावा करत ही हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुद्धा हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता पुढे राहुल गांधींवर काय कारवाई केली जाते हे येत्या काळात समजेल.
(हेही वाचा – आमच्या वाट्याला आले आणि त्यांचे मुख्यमंत्री पद गेले; राज ठाकरेंचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community