रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दापोलीमधील कथित साई रिसाॅर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे.
सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना ताब्यात घेतले असून, ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिका-यांना ताब्यात घेतले आहे.
( हेही वाचा: नाना पटोलेंविरोधातील असंतोष पुन्हा उफाळला; असंतुष्ट गट दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला )
साई रिसाॅर्टप्रकरणी कारवाई
दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसाॅर्ट प्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसाॅर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसाॅर्टप्रकरणी आता सदानंद कदम यांना अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community