मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला. तसेच, पालिकेची निवडणूक जिंकून आम्ही सत्तेत येणारच असेही भाष्य केले. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कुस्तित हसत खोचक टोला लगावला.
ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. आम्हाला जेलमध्ये टाकलं म्हणून सत्तेतून पायउतार झाले. आमच्या वाट्याला गेले म्हणूनच यांचं मुख्यमंत्री पद गेलं, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता. आता यावर प्रतिक्रिया देताना, आम्ही त्यांच्यावर बोलतच नाहीत, असं म्हणत आदित्य ठाकरे केवळ कुत्सित हसले.
( हेही वाचा: खत खरेदी करायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना ‘जात’ का विचारता?; अजित पवार सरकारवर संतापले )
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?
मनसे कधीच अर्धवट आंदोलन सोडून देत नाही. पाकिस्तान कलाकारांना हाकलून लावले, मशिदीवरील भोंगे खाली उतरवले. ही सगळी आंदोलने आपण केली, तेव्हा सो कॉल्ड हिंदुत्ववादी काय करत होते? चिंतन! त्यानंतर मला अयोध्या दौऱ्याला विरोध झाला. त्याचे पुढे काय झाले ठाऊक आहे ना? आमच्या वाट्याला यायचे नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले, त्याचा काय परिणाम झाला, मुख्यमंत्री पद गेले, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Join Our WhatsApp Community