कर्जाच्या रकमेची कर्जबुडव्यांकडून जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीने नवीन घोषणा जाहीर केली आहे. कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती देणा-याला सेबीकडून 20 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे बक्षीस दोन टप्प्यांत देण्यात येणार असल्याची माहिती सेबीने दिली आहे. माहिती देणा-याने कर्जबुडव्याच्या मालमत्तेची खरी माहिती दिली तरच तो पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे, असेही सेबीने स्पष्ट केले आहे.
कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती देणा-याला संपत्तीच्या मुल्याच्या अडीच टक्के किंवा पाच लाख रुपये रोख यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल. तसेच, कर्जाची वसुली झाल्यानंतर थकबाकीच्या 10 टक्के किंवा 20 लाख रुपये, जी रक्कम लहान असेल ती देण्यात येणार आहे.
( हेही वाचा: ….म्हणून दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा पेपर दिला नाही )
सेबीने वसुली प्रक्रियेअंतर्गत डिफाॅल्टर्सच्या मालमत्तेबद्दल ठोस माहिती देणा-यांना बक्षीस देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. माहिती देणा-याने दिलेल्या मालमत्तेची माहिती दिल्यास त्याला दिलेली बक्षीस रक्कम गोपनीय ठेवली जाईल, असे सेबीने म्हटले आहे.
515 कर्जबुडव्यांची यादी जारी
सेबीने हे बक्षीस जारी केल्यानंतर शुक्रवारी 515 कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यापैकी कोणत्याही कर्जबुडव्याची माहिती देता येणार आहे.
Join Our WhatsApp Community