केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) रिक्त जागांवरील भरतीत अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच बीएसएफ भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व बॅचच्या उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.
( हेही वाचा : किरीट सोमय्यांची न्यायालयीन चौकशी करा – उच्च न्यायालयाचा आदेश )
सीमा सुरक्षा दल कायदा 1968 च्या कलम 141 च्या उपकलम (2) मधील खंड (ब) आणि (क) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून गृह मंत्रालयाने गुरुवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने आपल्या आधिकारांचा वापर करून सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी संवर्ग (अराजपत्रित) भरती नियम 2015, म्हणजे सीमा सुरक्षा दल सामान्य कर्तव्य संवर्ग (अराजपत्रित) (दुरुस्ती) 2023 भरती मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी नियमावली तयार करण्याची घोषणा केली आहे. सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियम 2015 लागू होत असून, कॉन्स्टेबल पदाशी संबंधित विभागासाठी कमाल वयोमर्यादेत सूट असलेल्या सूचना लावण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
Join Our WhatsApp Community