दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (शिवाजी पार्क) परिसर फेरीवालामुक्त करण्यात आल्यानंतर याठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रात्रीच्या सत्रात साफसफाई मोहीम राबवण्याचा निर्णय महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने घेतला आहे. परंतु एका बाजुला शिवाजी पार्कमधील जनतेला दिलासा देणाऱ्या महापालिकेचा याठिकाणी केबलचे खोदकाम करून त्याचे पुर्नभरणा करताना झालेल्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. खोदलेले चर बुजवल्यानंतर त्यावर चक्क पायाच्या तळव्याच्या आकाराचा खड्डा पडला असून या बुटाच्या आकाराच्या खड्डयांमध्ये फिरण्यास येणाऱ्या नागरिकांचे पाय जावून मुरगळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिवाजी पार्ककरांचे पाय खड्डयात घालण्याचा विचार महापालिका प्रशासनाचे आहे का असा सवाल केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरांमध्ये मागील आठवड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही केबल टाकण्यासाठी मैदान परिसराच्या बाहेरील बाजुस खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम केल्यानंतर केबल टाकण्यात आली आणि केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या जागी स्टॅपिंग सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. हे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम आधीच्या कामाशी मिळते जुळते केले असले तरी या सिमेंटीकरणाचे काम झाल्यानंतर काही वेळातच फिरण्यास आलेल्या नागरिकाचा पाय त्यावर पडला आणि पायाच्या आकाराचा शिक्का उमटावावा असा खोलवर खड्डा पडला. यावर काँक्रिटीकरणानंतर गोणपाट टाकण्यात आल्यामुळे सुरुवातीला हा खड्डा लक्षात आला नाही. परंतु काँक्रिट सुकल्यानंतर गोणपाट हटवल्यानंतर त्यातील खड्डा दिसून आला. वनिता समाज हॉलसमोर आणि रवि स्टॉल्स शेजारील भागात हा खड्डा पडला असून याठिकाणी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांचा पाय जावून त्यांच्या पायाला इजा होण्याची भीती वर्तवली जात आहे. मागील आठ दिवसांपासून हा काँक्रिटवर हा खड्डा पडला असून महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष नाही. त्यामुळे भविष्यात या खड्डयात पाय जावून अनेक नागरिकांचा दुखापत होऊ शकते, असे बोलले जात आहे.
(हेही वाचा उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा! पहा व्हायरल व्हिडिओ)
Join Our WhatsApp Community