मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने)
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.
- ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
- ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
विशेष गाड्या
- तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.