देशभरात सध्या H3N2 या विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये अद्याप या आजाराचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असून सर्दी, खोकला, तीव्र ताप, अतिसार, घसादुखी, उलट्या, मळमळ, अंगदुखी ही या आजाराची वैशिष्ट्य आहेत. अशी माहिती देण्यात आलेली आहे.
( हेही वाचा : ३१ मार्चपूर्वी उरका ‘ही’ पाच कामे अन्यथा…भरावा लागेल मोठा दंड )
H3N2 या विषाणूची लक्षणे ही सर्वसामान्य रुग्णांसारखी जरी असली तरी या रुग्णांची कोरोना चाचणी नकारात्मक येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन सरकारमार्फत करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इन्फ्लूएंझा या सारख्या आजारांसाठी सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे.
निती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिले आहे. H3N2या इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. निती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक महत्त्वाची बैठक झाली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा निश्चित करावा, रुग्णांची तपासणी करावी, असे सांगितले आहे. निती आयोगाच्या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल धरावा आणि ताप, सर्दी व अंगदुखीची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community