शिवसेना खासदारांची वर्षावर तातडीची बैठक!

158

शिवसेना खासदारांची वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सकाळी १० वाजता होणार असून या बैठकीतील विषय अद्याप अस्पष्ट आहेत.

( हेही वाचा : १५ फुटाचा लोखंडी रॉड १७ व्या मजल्यावरून रिक्षावर पडला, मायलेकीचा जागीच मृत्यू)

या बैठकीमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी, २०२४ च्या लोकसभा निवडणुका यासंदर्भात व्यूहरचना आखली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मतदार संघांमधील प्रलंबित कामांचा आढाला घेतला जाणार असून सर्वोच्च न्यायालयातील निकाल आणि संजय राऊत यांच्याविरोधात आणलेला हक्कभंग, त्यावरील हरकतीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.