शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी शीतल म्हात्रे शनिवार मध्यरात्री दहिसर पोलीस ठाण्यात यांनी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणात दहिसर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या हा व्हायरल व्हिडिओ कोणी बनवला आणि कोणी व्हायरल केला याचा तपास दहिसर पोलीस करत आहेत.
शनिवारीपासून शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा हा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका रॅलीतील आहे. दरम्यान याप्रकरणी दहिसर पोलिसांनी विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. हा मॉर्फ व्हिडिओवरून शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर संशय व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करीत स्पष्टीकरण दिले आहे.
शीतल म्हात्रे ट्वीट करत म्हणाल्या की, राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडिओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?, असा सवाल त्यांनी केला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली असून अशोक मिश्रा आणि मानस कुवर असे आरोपींचे नाव आहे.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले? pic.twitter.com/rpaqbMtiZU
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 11, 2023
(हेही वाचा – राज्यसभेत कॉंग्रेसकडून गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे, तर रजनी पाटील यांच्याकडे व्हीपची जबाबदारी)
Join Our WhatsApp Community