‘सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी थेट राजीनामा देऊन टाकला. देत कोणी राजीनामा? बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असे विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘गुलाबरावांसारखी माणसे ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषा बोलतात त्या भाषेमध्ये ते बोलले. त्यामुळे ग्रामीण भागात जे काही बोलतो ते शहरी भागात आपण पॉलिशपणे बोलतो. त्यांना कदाचित रिस्क घेतली असे म्हणायचे असावे,’ असे भाजप भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.
गुलाबराव पाटील नेमक काय म्हणाले?
गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवले पाहिजे, असे उद्धव ठाकरेंना सांगितले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचे तर जाऊदे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.’
(हेही वाचा – ठाकरेंची शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतली; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला)
Join Our WhatsApp Community