पिकांच्या अनिश्चिततेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून येणाऱ्या रकमेची थकबाकी खूप जास्त काळ प्रलंबित राहिली आहे. इथेनॉल निर्मितीमुळे या समस्येवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तोडगा निघू शकेल. खूप मोठ्या प्रमाणात पीक आल्यास अतिरिक्त ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन घेता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक निश्चित उत्पन्न सुनिश्चित होईल. यामुळे इथेनॉल निर्मितीवरचा भर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सहाय्यक ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी कर्नाटकातल्या मांड्या इथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे लोकार्पण आणि म्हैसूर-कुशालनगर चौपदरी महामार्गासाठीच्या पायाभरणीचा समावेश आहे.
गेल्या वर्षी देशातील साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांच्या इथेनॉलची विक्री केली, ज्यामुळे या साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी वेळेवर चुकती करणे शक्य झाले. २०१३-१४ पासून ७०,००० कोटी रुपयांचे इथेनॉल साखर कारखान्यांकडून खरेदी करण्यात आले आहे आणि हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत, यामधल्या साखर सहकारी संस्थांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे सहाय्य आणि करामध्ये सवलत यांसारख्या तरतुदींचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – मंत्रीपदाचा सट्टा लावून शिंदेंबरोबर.., गुलाबरावांच्या या विधानावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…)
यावेळी पंतप्रधानांनी सुरुवातीला भुवनेश्वरी देवी आणि आदिचुंचनगिरी आणि मेलुकोटच्या गुरुंना वंदन केले. कर्नाटकाच्या विविध भागातल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तसेच लोकांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेषतः मांड्याच्या लोकांनी त्यांचे ज्याप्रकारे प्रेमपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्यावर आशीर्वादाची बरसात केली, त्याबद्दल आभार व्यक्त केले. कर्नाटकातील लोकांकडून मिळणाऱ्या स्नेहाचा विशेष उल्लेख करत, पंतप्रधान म्हणाले की, हे दुहेरी इंजिनचे सरकार, जलद गतीने विकासाचे प्रकल्प पुढे नेत समाजातील प्रत्येक नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम करत आहे.
Join Our WhatsApp Community