हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात १४ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
या आधीही मार्चच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १६ मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. याचा परिणाम फळे, अन्नधान्यासह शेतकऱ्यांवर होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
(हेही वाचा – मुंबईचे तापमान ३८ अंशावर! मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस? काय आहे हवामान विभागाचा अंदाज)
Join Our WhatsApp Community