आता आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची ‘परीक्षा’ सुरु

233
राज्यात मागील २ वर्षे कोरोनाचे संकट होते, त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, तेंव्हा तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्याप्रकारे काम केले त्याचे सर्वसामान्य जनतेने कौतुक केले होते. आता राज्यात आणखी एक संसर्गजन्य आजार आला आहे. देशासह राज्यावर  H3N2 या संसर्गजन्य आजाराचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना याबाबत अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आरोग्यमंत्री सावंत यांनी परीक्षा सुरु झाली आहे.
या व्हायरसचा धोका आणि वाढता फैलाव लक्षात घेता सर्वच आरोग्य यंत्रणांना या व्हायरस वर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. विशेषत: ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्हासरसचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घ्यावी. या संदर्भात खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. अद्यपी कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.

राज्यात H3N2 इन्फ्लूएन्झा व्हायरसचे १७० रुग्ण 

 राज्याच्या विधानसभेतही H3N2 इन्फ्लूएन्झा व्हायरसवर मुद्दा उपस्थित करण्यात आला. सरकारने यावर निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. राज्यात सध्या H3N2 चे 170 रुग्ण आहेत. तेव्हा राज्य सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणीही अजित पवारांनी केली. देशात H3N2 व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, गर्दीची ठिकाने टाळण्याच्या सूचना नीती आयोगाने केल्या आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठांना लागण झाल्यास काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचे रूग्णही काही राज्यात वाढले आहेत, त्यावरही चिंता व्यक्त करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.