मालाड पश्चिम येथील आप्पापाडा झोपडीला भीषण आग लागली. आगीने उग्र रूप धारण केले असून, त्यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यात अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.
झोपडपट्ट्यांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहचण्यासाठी अडचणी येत आहेत. आगीनंतर घरात ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे इतर भागातही आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आप्पापाडाचा हा भाग कुरारमध्ये येतो, जो आनंद नगर म्हणून प्रसिद्ध आहे. आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस, रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंचा ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश)
ही आग तिसऱ्या लेवलची होती. या आगीत घरगुती साहित्य, विजेच्या वायर, विजेची उपकरणे, एल पी जी गॅस, कपडे, गाद्या, उशा यांमुळे आगीने सुमारे २ ते ३ हजार झोपड्यांना भस्मसात केले. तब्बल १० हजार चौ. मीटर परिसर आगीच्या कवेत आला. आग विझवण्यासाठी १२ मोटार पंप लागले. रात्री ९.३५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवता आले.
आगीने पीडित कुटुंबीयांना बुवा साळवी मैदान, चैतन्य हॉल आणि महापालिकेच्या मेटरनिटी हॉस्पिटल समोर निवास आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये एका पुरुषाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community