विज्ञानात दिवसेंदिवस क्रांती घडत आहे. अनेक नवनवी शोध लागत आहेत. आपण ज्या गोष्टी काल्पनिक चित्रपटांमध्ये पाहतो त्या गोष्टी आता प्रत्यक्षात रुपाला येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस विकसित झाल्यापासून विज्ञानाद्वारे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. आता वैज्ञानिकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.
आता तर शास्त्रज्ञांनी मानवी पेशींचा वापर करुन असा संगणक तयार केला आहे की कुणालाही यावर विश्वास बसणार नाही. शास्त्रज्ञांनी आता ऑर्गनाइज्ड इंटेलिजेंसच्या सहाय्याने असा संगणाक तयार केला आहे, जो आर्टिफिशियल इंटलिजेंसलाही मागे टाकू शकेल. अमेरिकेच्या जॉन हॉप्किंस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की, ऑर्गनाइज्ड इंटेलिजेंस हे नवीन क्षेत्र आहे. ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर चिपमध्ये किंवा इतर पद्धतीने उपकरणामध्ये केला जातो.
(हेही वाचा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाईंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुभाष देसाईंना…
ऑर्गनाइज्ड इंटेलिजेंसला प्रयोगशाळेत तयार केलेल्या ऑर्गन्सशी जोडले जाते. शास्त्रज्ञ ज्या टिश्यूजच्या सहाय्याने प्रयोगशाळेत ह्यूमन ब्रेन सेल्स बनवत आहे, ऑर्गनाइज्ड इंटेलिजेंस त्यांच्या मदतीने काम करते. या ऑर्गनाइज्ड इंटेलिजेंसचा वापर बायोकंप्युटरमध्ये केला जातो.
शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की बायोकंप्युटर ह्यूमन ब्रेन म्हणजे मानवी मनाप्रमाणे काम करु शकतो. म्हणजे निर्णय घेण्यासाठी बायोकंप्युटर माणसांवर अवलंबुन राहणार नाही. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक थॉमस हार्टंग यांच्या म्हणण्यानुसार, ऑर्गनॉइड इंटेलिजन्स तयार केलेल्या प्रोग्रामच्या मदतीने कार्यान्वित केले जाईल. मानवी मनाप्रमाणे काम करणारा हा बायोकंप्युटर नक्कीच इतिहास रचणार आहे यात वाद नाही.
Join Our WhatsApp Community