विधिमंडळाच्या बाहेरील परिसरात भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आमने-सामने आले आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. तसेच जोरदार शाब्दिक वार करत दोघांनी एकमेकांना खडेबोल सुनावले.
विधिमंडळाबाहेर नक्की काय घडले?
नितेश राणे प्रसार माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी अनधिकृतपणे मदरसा उभारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी अबू आझमी यांच्याकडे नितेश राणेंनी तक्रार केली. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे, अशी तक्रार राणेंनी आझमी यांच्याकडे केली. यावर अबू आझमी म्हणाले की, कोणत्याही धर्माचे असले तरी अनधिकृत बांधकाम पाडलेच पाहिजे, असे मत मांडले. त्यावर राणे म्हणाले की, कारवाई करताना हत्यारे काढली जातात. तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवतो, असे त्यांनी आझमींना आव्हान केले. पण आझमी यांनी हे खोटे आहे, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो, असे म्हणत त्यांनीही राणेंना आव्हान केले.
यानंतर राणे यांनी लव्ह जिहाद यांचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणाले की, अनधिकृत बांधकाम पाहिल्यानंतर तुम्हाला लव्ह जिहाद मान्य करावे लागले, असे माझे तुम्हाला आव्हान आहे. फक्त आता तारीख, वेळ सांगा. यावर आझमी म्हणाले की, मी तुम्हाला खोटे आहे, हे सांगण्यासाठी ५० ठिकाणी घेऊन जातो.
तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा, असे राणे आझमींच्या प्रत्युत्तरावर म्हणाले. त्यानंतर आझमी तिथून निघून जात असताना म्हणाले की, हे असे होऊ शकत नाही. हे अशक्य आहे.
(हेही वाचा – साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीची मोठी कारवाई! तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना अटक)
त्यावर राणेंनी आझमींना खडेबोल सुनावले. म्हणाले की, यांना सत्य स्विकारायचे नाही, पत्रकार परिषद घेऊन यांनी सांगावे ना. यांच्यात सत्य ऐकण्याची ताकद नाही. मोजक्या काही लोकांना हाताशी घेऊन त्यांना मोठे केले जात आहे. यांच्या या हरकतीमुळे त्या लोकांना मदत होतेय, हे कळत नाहीये. यांच्यामुळे जर मुलींचे आयुष्य खराब होत असेल तर बरोबर नाही ना. ऐकण्याची यांच्यात हिंमत नाही. चार-पाच लोकांची माहित घेऊन हे लोकं बोलतायत. ज्या मुलींचे आयुष्य खराब झाले आहे, ते ऐका ना. मी खरे बोलतोय, हे खडकले ना. लव्ह जिहादबद्दल खरी माहिती देतोय आणि आज नाहीतर उद्या यांचे खरे चेहरे उघड होणार आहेत. म्हणून ते तडफडीने आले जवळ. आमच्या हिंदु मुलींचे आयुष्य बर्बाद होईल, याला हे जबाबदार असणार का?
Join Our WhatsApp Community