शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात इन्कमिंग सुरू असून ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता आणखीन एक ठाकरेंचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री दीपक सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. सावंत यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात दीपक सावंत आरोग्य मंत्री होते. ते विधान परिषदेचे माजी सदस्य असून ते दोन वेळेला मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते. २००६ आणि २०१२ साली शिवसेनेच्या वतीने दीपक सावंत विधान परिषदेवर निवडून गेले होते. पण त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.
दीपक सावंत यांच्याआधी शिवसेनेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे युनियनने पक्षप्रवेश केला. तसेच मंगळवारी रात्री शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई सुरेश गोरे, त्यांचे बंधू नितीन गुलाब गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी स्थानिक स्तरावरील अनेक जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता.
(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण – उद्धव ठाकरे)
Join Our WhatsApp Community