उध्दव ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी आयात नेत्यांकडून प्रयत्न केले जात असून जिथे पक्षातील वरिष्ठ नेते हे युवा सेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना चरणस्पर्श करतात तिथे आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पाया पडून आपले संस्कार दाखवण्याच्या प्रयत्नात ठाकरी बाणा गहाण ठेवला. ठाकरे घराण्यातील कोणी कधीही आपल्या पक्षातील नेत्यांसमोर झुकत प्रणाम केला नाही, तिथे आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबांसह वडिलांसह स्वत:वर जोरदार टीका करणाऱ्या अंधारेंच्या पाया पडत आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केल्याने आता ठाकरेंना अंधारेंच्या पायावर लोळण घालण्याची वेळ आली का असा सवाल उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : ‘जाणता राजा’च्या आमंत्रणातून भाजपची नवी खेळी)
मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि दहिसरमधील नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यासह काही शिवसैनिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत गेल्याने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने काही दिवसांपूर्वी बोरीवलीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला सुरुवात झाल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण सुरु असताना आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. आदित्य ठाकरे यांना वाहनातून उतरल्यानंतर विधान परिषद सदस्य विलास पोतनीस व विभागप्रमुख उदेश पाटेकर हे व्यासपीठावर घेऊन गेले. आदित्य ठाकरे व्यासपीठावर गेल्यानंतर सर्वांना हात जोडून नमस्कार करत सुषमा अंधारे यांच्या जवळ येतात आणि त्यांना हात जोडून वाकून नमस्कार करतात.
आदित्य ठाकरे यांनी अंधारेंसमोर वाकून नमस्कार करताना आपण संस्कारीत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु याच आदित्य ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे वाकून नमस्कार करतात. ज्या नेत्यांनी शिवसेना वाढवली त्या ज्येष्ठ नेत्यांसमोर आदित्य ठाकरे हे कधी वाकून नमस्कार करु शकले नाही, परंतु ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे तसेच खुद्द आदित्य ठाकरे यांच्यावर मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात टीका केली केली, त्याच अंधारेंना हात जोडून नमस्कार करण्याऐवजी त्यांना वाकून नमस्कार केला हा प्रकार सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आदित्य ठाकरे हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कधी चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतला असे प्रकार तुरळक असून ज्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला अशा अंधारेंचा आशीर्वाद घेत आदित्य ठाकरे यांनी पक्षातील त्यांचे स्थान मोठे करत इतर नेत्यांचे स्थान कमी केले आहे, असेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community