मागील ९ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षांवर सुरु असलेली सुनावणी अखेर गुरुवार, १६ मार्च रोजी संपली, मात्र ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गुरुवारी न्यायालयात शेवटचा युक्तीवाद सुरु होतो तेव्हा शिंदे गटाचे वकील आणि उद्धव ठाकरे गटाचे वकील या दोघांनीही युक्तीवाद केला. शेवटच्या सुनावणीच्या वेळीही न्यायालयाने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा कसे बोलावणार? असा सवाल केला. तर ठाकरे गटाचे वकील मनू सिंघवी यांनी ‘परिस्थिती जैसे थे ठेवा’, अशी विनंती केली. ठाकरे गटाच्या वकिलाने भावनिक पातळीवरही युक्तीवाद केला. दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांचे आभार मानले आणि अंतिम निकाल राखून ठेवला. दरम्यान ५ न्यायाधीशांच्या खंडपीठातील न्यायमूर्ती शहा हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यानंतर न्यायालयाला उन्ह्याळ्याची सुटी पडणार आहे अशा वेळी निकाल त्या आधीच येईल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा कोणत्याही मंत्र्याच्या कारभारात ढवळाढवळ करू नका; उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्र्यांना निर्देश)
Join Our WhatsApp Community