मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत राज्य सरकार मदत करणार आहे. या योजनेचे नेमके स्वरूप काय आहे याबाबत जाणून घेऊया…
( हेही वाचा : सरकार पडण्याची चाहुल लागल्याने मंत्रालयात लगबग सुरू; नाना पटोले यांचा दावा)
कोणाला मिळणार लाभ ?
पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांना मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता चौथीत ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यावर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण ९८ हजारांची मदत मुलींना सरकारकडून करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून जवळपास २३ लाख ५५ हजार कुटुंबांकडे केशरी, पिवळे रेशनकार्ड आहेत.
लेक लाडकी योजनेचा विस्तार
मुलींवर आधारित पूर्वीच्या योजनांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने लेक लाडकी ही योजना आखून या योजना विस्तार करण्यात आला आहे. लेक लाडकी योजनेनुसार पिवळ्या, केशरी रेशनकार्ड धारकांच्या मुलींना हा लाभ मिळणार आहे.
“मुलगी झाली, लक्ष्मी आली”
- जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये,
- पहिलीत ४ हजार रुपये
- सहावीत ६ हजार रुपये
- अकरावीत ८ हजार रुपये
- मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये
- एकूण ९८ हजारांची मदत