मनी लाँड्रिंग प्रकरणात शुक्रवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या ईडी कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे. हे प्रकरण उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमधील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च आणि पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी अनुक्रमे 40 हजार आणि 45 हजार रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली.
( हेही वाचा : आता भटक्या कुत्र्यांच्या मागे धावणार महापालिका)
सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिसोदियांना ईडीने अटक केली. यापूर्वी न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 21 मार्चपर्यंत पुढे ढकलली होती. सीबीआय अबकारी धोरणाचाही तपास करत आहे. मागील सुनावणीदरम्यान राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष सीबीआय न्यायाधीश एम के नागपाल यांनी सिसोदिया यांना 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आणि सांगितले की, त्यांचा आणि इतर काही जणांच्या चौकशीची आवश्यकता आहे.
Join Our WhatsApp Community