भाजप- शिवसेनेचे जागा वाटप झालेले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

126

भाजप- शिवसेना यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झाले नसून कोणतेही सूत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिका-यांना निवडणूक तयारीच्यादृष्टीने मार्गदर्शन करताना केले होते. निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचा विचार होईल. शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा: ठाकरेंचा बालेकिल्ला भेदण्यासाठी मनसे पाठवणार देशपांडे यांना वरळीत )

 भाषण काढून टाकले

भाजप 240 जागा लढणार असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी पक्षाचे प्रवक्ते व अन्य पदाधिका-यांपुढे बोलताना केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली. शिवसेनेला 48 जागाच वाट्याला येणार याबाबत चर्चा सुरु झाल्याने, वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत हस्तक्षेप केल्यावर हे भाषण काढून टाकले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.