Amritpal Singh Arrest: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक: संपूर्ण पंजाबमध्ये २४ तास इंटरनेट बंद

345

खलिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार, जालंधरच्या नकोदर येथून अमृतपालला अटक करण्यात आली आहे. जवळपास २ तासांच्या संघर्षांतर अमृतपालला अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. दरम्यान अमृतपालच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके तैनात करण्यात आली होती. रविवारी, पंजाबच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

शनिवारी अमृतपालच्या ६ साथीदारांना गजाआड

अलीकडेच अमृतसरच्या अजनाला ठाणे पोलीस स्थानकाबाहेर आपल्या समर्थकांसह प्रसिद्धीच्या झोतात आलेला अमृतपाल सिंग पंजाब पोलिसांच्या रडारवर होता. शनिवारी अमृतपालच्या ६ साथीदारांना पंजाब पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांना जालंधरच्या मेहतपूर परिसरातून अटक करण्यात आली होती. माहितीनुसार, जे सर्वजण अमृतपालसोबत मोगा जात होते.

यामुळे पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद

अमृतपालच्या अटकेनंतर वातावरण बिघडू नये यासाठी पंजाब पोलिसांनी संपूर्ण पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाबमध्ये एसएमएससोबत मोबाईल इंटरनेट सेवा आणि डोंगल सेवाही बंद करण्यात आली आहे. रविवारी, दुपारी १२ वाजेपर्यंत या सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी अमृतपाल सिंगचा पाठलाग करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये अमृतपाल एका वाहनात बसलेला दिसत आहे आणि त्याचा एक साथीदार पोलीस आपल्या मागे असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येत आहे.

(हेही वाचा – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना अटक होणार ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.