महापालिका मुख्यालय इमारत होणार चकाचक

141

मुंबईतील १२९ वर्षे जुन्या असलेल्या पुरातन महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून याअंतर्गत या इमारतीची मंगलोरी कौलांसह छत आणि भिंतीचे डागडुजी करत रखरखाव केला जाणार आहे. या पुरातन इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या इमारतीच्या दुरस्ती आणि जिर्णोध्दाराचे काम यापूर्वीच हाती घेतले असून पाचव्या टप्प्यातील कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

मुंबईचे दमट हवामान आणि सततच्या ऊन पावसामुळे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला असलेल्या दगडी भिंतीवर रासायनिक प्रक्रिया होऊन, इमारतीच्या दगडांना बुरशी येणे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतींची वाढ होणे, नवीन भेगा तयार होणे, दगडांचे आवरण झिजणे आदी बाबींमुळे इमारतीचा बाहेरील भाग खराब दिसतो. ज्यामध्ये घुमट, तुळ्या, कमानी आदी बांधकामांच्या भागांची विशेष दुरुस्ती करून इमारतीचे आयुष्य वाढवणे तसेच अनेक ठिकाणाहून होणारी गळती थांबवण्यासाठीची प्रकिया करणे आदी कामांच्या दृष्टीकोनातून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार असून यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एम देवांग कन्स्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी सुमारे १५ टक्के कमी दराने बोली लावून या कंपनीला विविध करांसह ९ कोटी ९२ लाख रुपयांमध्ये हे काम सोपवले आहे.

मुख्यालय इमारतीचे वैशिष्ट्य

  • इमारतीची उंची २३५ फुट
  • निओ गॉथिक शैलीत मालाड आणि पोरबंदर दगडाचे बांधकाम
  • गोल घुमट
  • छतावर कौले

दुरुस्तीमध्ये कोणती कामे केली जाणार

  • मंगलोर छत आणि त्यांच्या लाकडी बांधकामांची दुरुस्ती
  • छतावरील लाकडी फळ्या काढून दुरुस्ती करणे आणि नवीन बसवणे
  • छतांची गळती बंद करणे
  • बाथरुममधील गळती दुर करणे
  • लाकडी मजल्यांच सांधे स्टेनलेस स्टील अथवा लोखंडी प्लेट द्वारे मजबूत करणे
  • पोटमाळ्यावरील लाकडी खांब मजबूत करणे
  • कमानीच्या दगडी आधार खांबांचे बळकटीकरण करणे
  • घुमटाचे ग्राऊंटींग करणे
  •  खिडक्या व दगडांमधील पोकळी भरणे
  • जुन्या झालेल्या फरशी नव्याने बसवणे
  • छताचे लाकडी वासे पॉलिसिंग करणे
  •  छतावरील मनोऱ्यांवर नवीन लाकडी नक्षीदार भाग बसवणे
  • बाह्य दर्शनी भागाची दुरुस्ती व  जिर्णोध्दार करणे
  • बाह्य दगडी भिंतीची साफसफाई करणे
  • वाळवी प्रतिबंधक उपाययोजना व इतर कामे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.