माजी मंत्री आणि काॅंग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे. अस्लम शेख यांनी मढ मार्वेत एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांनी मढ, एरंगल आणि भाटी गावातल्या 49 स्टुडिओंसंदर्भात चौकशी समिती स्थापन केली होती. याच चौकशी समितीचा अहवाल आता ईडीने मागवला आहे. मनी लाॅंड्र्रिंग आणि फेमा कायद्यानुसार, हा अहवाल तपासणार असल्याचे ईडीने म्हटले आहे.
( हेही वाचा: राणे -राऊत वाद आता न्यायालयात; राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस )
मढ स्टुडिओ घोटाळा प्रकरण
- मुंबईत मालाड पश्चिममध्ये मढ, एरंगलमध्ये व्यावसायिक स्टुडिओचे बांधकाम
- मढच्या समुद्रात नियमांना धाब्यावर बसवत स्टुडिओचे बांधकाम केल्याचा आरोप
- 5 स्टुडिओ सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप
- अस्लम शेख यांनी स्टुडिओच्या बांधकामास मदत केल्याचाही सोमय्यांचा आरोप
- सोमय्यांच्या तक्रारीनंतर पर्यावरण विभागाकडून अस्लम शेख यांनी नोटीस