महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकाद मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद अडचणीत आल्याची चर्चा झाली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील निष्क्रियता आणि नाना पटोले यांच्यासोबतचा वाद या पार्श्वभूमीवर पक्षाकडून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पटोलेंसोबत काम करणे अशक्य
कसबा- चिंचवड पोटनिवडणुकीनंतर यासंदर्भात निर्णय होईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोरात यांनी पटोलेंबोसत काम करणे अशक्य असल्याचे पत्र काॅंग्रेस अध्यक्षांना पाठवल्यामुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. थोरात आणि पटोले हे दोघेही राहूल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. असे असल्यामुळे या दोघांमधील वाद मिटणार की दोघांवरही कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
( हेही वाचा: ठाकरे VS शिंदे: धनुष्यबाणासंदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय )
Join Our WhatsApp Community