हॉटेल, रेस्टॉरंटमधील मेनूमध्ये भरडधान्यांचा होणार समावेश! आंतरराष्ट्रीय ‘तृणधान्य’ वर्षानिमित्त विशेष उपक्रम

105

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने हॉटेल, रेस्टॉरंटमधील मेनूमध्ये भरडधान्याचा समावेश करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

( हेही वाचा : रोहित शर्माच्या शतकानंतर जाडेजा-अक्षर पटेलची तुफान फलंदाजी! भारताने उभारला ४०० धावांचा डोंगर )

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोडो, कुटकी, सावा, राळा आणि राजगिरा आदी पिकांचा समावेश आहे. ही सर्व पौष्टिक तृणधान्य लोह, कॅल्शिअम, झिंक, आयोडीन सारख्या सूक्ष्म पोषक घटकांने समृद्ध आहे, तसेच ग्लूटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य डायरिया, बद्धकोष्टता आतड्याच्या आजारावर प्रतिबंध करतात. तसेच या तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, अॅनिमिया, उच्चरक्तदाबरोधक आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारीत पदार्थ कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यास सक्षम असल्याने आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मिलेट ऑफ मंथनुसार फेब्रुवारी महिना ज्वारीसाठी 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक राज्यास एक विशिष्ट महिना नेमून दिला आहे. महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना नेमून दिला आहे. मिलेट ऑफ मंथनुसार फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित केला आहे.

तृणधान्याच्या उपयोगामुळे ग्राहकांना पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्धता होऊ शकतील, त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तयार होणाऱ्या आणि विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये ज्वारी, बाजरी आणि इतर भरडधान्याचा उपयोग करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.