ठाण्यातील राष्ट्रवादीमधील गळती थांबेना; पवारांच्या निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

94

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील गळती काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते असो किंवा पदाधिकारी असो कोणीना कोणी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राष्ट्रवादीला पडणारे खिंडार हे हळूहळू मोठे होत आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जाणाऱ्या नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. या नेत्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा होती.

दरम्यान शिंदे गट आणि भाजपाने ठाण्यात राष्ट्रवादीला टार्गेट ठरवले असल्याचे चित्र दिसतय. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता ठाण्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी तिवरे यांच्या समर्थकांनीही भाजपात प्रवेश केला. नाशिक येथील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

(हेही वाचा – नाशिकमध्ये तांबे-थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा)

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह पाच माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात जाणार असल्याचे समोर आले. याबाबतही माहिती स्वतः हणमंत जगदाळे यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करून दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.