निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय; फडणवीसांची टीका

152

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार अतिशय धडाडीने काम करीत आहे. तो स्पीड मॅच करता येत नसल्याने विरोधक प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यामुळे ‘नरेटिव्ह’ तयार करायचा प्रयत्न आहे. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता आणि आम्ही सत्ता स्थापन करून तो निर्णय-लकवा आपण संपविला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

( हेही वाचा : नासा स्त्री आणि पुरुषाला एकत्रितपणे मंगळ ग्रहावर पाठवणार नाही; काय आहे कारण?)

नागपूरमध्ये भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, गेले 2.5 वर्ष शेतकरी आणि कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आता आपले सरकार आहे. आतापर्यंत ७ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली. आपल्या सरकारला यशस्वी करायचे आणि त्यासाठी सर्वस्व झोकून द्यायचे आहे, ही पुढच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना असली पाहिजे, असेही ते म्हणाले.

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यात आले, तेव्हा आज आंदोलन करणारे गप्प बसायचे आणि आता रस्त्यावर फक्त अस्वस्थतेतून ते उतरत आहेत. वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला डिचविण्याचा नाही तर खिल्ल्ली उडविण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच सामान्य जनता मोर्चात आली नाही आणि नॅनो मोर्चा झाला. पैसे वाटतानाचे व्हिडिओ आले, कोण कशासाठी आले, हे ठावूक नसलेला व्हिडिओ पाहिला. आपली लढाई विरोधकांशी नाही, आपल्याशी लढण्याचा त्यांच्यात दमच नाही. आपली लढाई नरेटिव्हशी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

‘मविआ’ने हफ्तेखोरी केली

  • आम्ही सरकारमध्ये आल्यावर आढावा घेतला, तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र त्यांनी 16 व्या क्रमांकावर नेऊन ठेवला होता. काही हप्ते मिळत नाही, तोवर सामान्य जनतेला पैसे रिलीज केले नाही.
  • मविआच्या काळात विविध घटकांच्या शिष्यवृत्ती थांबल्या. आता आपले सरकार आल्यावर 1000 कोटी दिले. सभागृहात मी सगळे आकडे देणार आहे.
  • ज्यांची कॅसेट ‘मुंबई तोडण्याचा डाव’ यावर अडकली आहे, त्यांना मेट्रो-3 का झाली नाही, मुंबई आणि महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प का अडकवले, याचे उत्तर मागितले पाहिजे.
  • 15 दिवसात मुंबई सुंदर होऊ शकते, तर 25 वर्ष सत्तेत राहणारे ती का करू शकत नाही, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

सीमावाद आता तयार झाला का?

गेल्या कित्येक दशकांपासून सुरू असलेला सीमावाद आता उकरून काढला जात आहे. आमचे सरकार आल्यावर सीमावाद आता तयार झाला का, असा सवाल फडणवीस यांनी केला. उलट आपले सरकार होते तेव्हा न्यायालयात खटल्यासाठी पुढाकार घेतला. 77 गावांना आपल्या काळात पाणी दिले. मधल्या 2.5 वर्षात काहीच झाले नाही. आता काल पुन्हा 2000 कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी मंजूर केले. काही विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि ठराव करून घेतले. सचिन कल्याणशेट्टी यांचे मी अभिनंदन करतो, त्यांनी त्या गावकऱ्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राहण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.