संसदेचे हिवाळी अधिवेशन नियोजित वेळेपूर्वी संपल्याचे समोर आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. लोकसभेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असे म्हटले की, 68 तास 42 मिनिटे चाललेल्या हिवाळी अधिवेशनात या सभागृहात एकूण 13 बैठका झाल्या. तर सभागृहातील चालू अधिवेशनात 97 टक्के कामकाज झाले. या अधिवेशनातील लोकसभेत 9 सरकारी विधेयके मांडण्यात आली आणि एकूण 7 विधेयके मंजूर झाली.
(हेही वाचा – आनंदाची बातमी! आता भारतात Covid-19 वर मात करणं होणार आणखी सोपं)
चीनमध्ये कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढल्याने देशातही कोरोनाचा संसर्ग फैलण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री, निती आयोग, आरोग्य सचिव आदींनी कोरोनाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. असे असताना 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनातील कामकाज आज, शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
आतापर्यंत झालेल्या संसदेच्या कार्य काळात सर्व पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत सार्वजनिक महत्त्वाच्या 374 मुद्दे मांडले. तर 20 आणि 21 डिसेंबर रोजी नियम 193 अंतर्गत देशातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वापराच्या महत्त्वाच्या विषयावर अल्पकालीन चर्चा झाली. या चर्चेत सभागृहातील 51 सदस्यांनी भाग घेतला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तराने सभागृहातील चर्चा संपली. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज 7 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव होता, परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्याचे समजते. अधिवेशनादरम्यान सरकारच्या मंत्र्यांनी 43 निवेदने सादर केलीत, 1811 कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सभागृहाच्या कामकाजात सहकार्य केल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदीय कामकाज मंत्री आणि सर्व पक्षांच्या नेत्यांचेही आभार मानले.
Join Our WhatsApp Community