ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत रिलायन्स अस्टाल्डी जॉइन्ट व्हेंचर या कंपनी कडून मेट्रो ४ चे काम चालू असून मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार येत आहे. ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्यासाठी घोडबंदर रोड दिनांक 25 ते ३० डिसेंबर 2022 हे ६ दिवस रात्री 23.55 ते सकाळी 04.00 वाजेपर्यंत वाहतुकीकरता बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे –
प्रवेश बंद 1) मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड. अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका मानकोली अजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) मुंबई ठाणे कडून घोडबदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड़, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद २):- मुब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाड़ी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अनुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद ३):- नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाच्या सर्व जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद”करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील (जड अवजड वाहने सोडून इतर हलकी वाहने ही गर्डर टाकणेचे वेळी ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या दरम्यान मुख्य रस्त्याचे एका वाहिनीने पुढे इच्छित स्थळी जातील)
1) दि. २५/१२/२०२२ रोजी रात्री २३:५५ वा. ते दि २६/१२/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत
2) दि. २६ / १२ / २०२२ रोजी रात्री २३:५५ वा ते दि २७/१२/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत
3) दि .२७/१२/२०२२ रोजी रात्रौ २३:५५ वा. ते दि. २८/१२/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत
4) दि. २८/१२/२०२२ रोजी रात्री २३: ५५ वा ते दि. २९/१२/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत
5) दि. २९/१२/२०२२ रोजी रात्री २३:५५ वा ते दि. ३०/१२/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत
6) दि. ३०/१२/२००२ रोजी रात्री २३:५५ वा ते दि. ३१/१२/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वाजेपर्यंत
ही अधिसूचना वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अमलात राहील. वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community