वीर सावरकरांच्या दूरदृष्टीवर आधारित भारताने संरक्षण धोरणे आखली असती तर भारत महासत्ता असता – उदय माहूरकर

90

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामरिक दूरदृष्टीवर आधारित भारताने सामरिक आणि संरक्षण धोरणे आखली असती तर भारत आतापर्यंत जागतिक महाशक्ती महासत्ता बनला असता, असे वक्तव्य भारताचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केले आहे. राजधानी दिल्लीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वरिष्ठ नौदल अधिकारी आणि नौदलाचे विद्यार्थी यांना संबोधित करताना वीर सावरकरांची सामाजिक दूरदृष्टी या विषयावर संवाद साधला.

(हेही वाचा – तीन वर्षात महाराष्ट्राने १२ लाख कोटींचा आयकर भरला! यादीत इतर कोण?)

नवी दिल्लीत नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिनल एस. एन. घोरमाडे यांनी या कार्यक्रमाचे खास आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून उदय माहुरकर यांनी “वीर सावरकरांची सामरिक दूरदृष्टी” या विषयावर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि नौदल विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सविस्तर विवेचन केले.

काय म्हणाले उदय माहूरकर?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपण फक्त क्रांतिकारक म्हणून ओळखतो. परंतू ते राष्ट्रवादी विचारवंत होते. भारतीय राष्ट्रवादाचा मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या विचारांचा मी १९९६ पासून अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की, भारताच्या सामरिक आणि संरक्षण धोरणाविषयी त्यांनी मूलभूत चिंतन केले आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे भारताने आता संरक्षण आणि सामरिक धोरणाचे पितामह यादृष्टीने पाहिले पाहिजे, असे उदय माहूरकरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.

पुढे ते असेही म्हणाले, वीर सावरकरांनी भारताच्या संरक्षण नीतीचे बारकाईने अध्ययन केले आणि अत्यंत मूलगामी महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या सूचनांकडे त्यावेळीच लक्ष दिले असते तर भारत आत्तापर्यंत जागतिक महासत्ता आणि महाशक्ती बनला असता. परंतू, भारताने आता वीर सावरकरांची सामरिक दूरदृष्टी आत्मसात करून संरक्षण धोरणे आखली असल्याने माहुरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.