देवगड बंदरातील मच्छीमारीसाठी गेलेली गणपत निकम यांची पुण्यश्री नौका खोल समुद्रात मच्छीमारी करत होती. यावेळी अचानक नौकेने पेट घेतल्याने नौकेचे मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी, २५ डिसेंबर रोजी घडली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास मच्छिमार बांधवांना यश आले. तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.
असा होता थरार
पुण्यश्री नौका शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी गेली होती. रविवारी जेव्हा नौकेला आग लागली. त्यावेळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नौकेवरील खलाशांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर आग भडकतच गेली. आग नियंत्रणात येत नसल्याचे मच्छिमार बांधवांच्या लक्षात येताच नौकेवरील मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात उड्या घेत आपले जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवानी आपल्या नौका घेऊन समुद्रात धाव घेतली. चार तासाच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक मच्छिमार ग्रामस्थ यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. नौकेवरील आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जळीत नौकेला देवगड बंदरात आणण्यासाठी इतर मच्छिमार बांधवांनी शर्थीचे प्रयत्न केले.
(हेही वाचा Coronavirus : महाराष्ट्र सतर्क; ‘या’ मंदिरांमध्ये मास्क सक्ती)
Join Our WhatsApp Community