मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भूखंड घोटाळ्याचा आरोप केल्यावर एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. स्वतःचे जावई २२ महिन्यांपासून जेलमध्ये आहे, त्यांना बाहेर काढण्यासाठी आधी प्रयत्न करा, असा टोला हाणला.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
पहिले आपल्या जावयाला सोडवा. ते कोणत्या कारणावरून जेलमध्ये आहेत, त्यांना बाहेर काढा. ते साधुसंत आहेत म्हणून जेलमध्ये आहेत का? तर कृपया करून त्यांनी आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदेंवर आरोप करावा, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचे टायटॅनिक जहाज बुडेल, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे. कुणी खोके, म्हणा कुणी जहाज म्हणा…मात्र आमच्या एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट भाग रही है, असे असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद परांजपे यांना जोरदार उत्तर दिले आहे. तर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, खडसे यांनी फार नैतिकतेच्या गप्पा करू नये. आपण जमिनीत किती खोल आहोत याचा विचार करा. तुम्ही आणि मंदा खडसे या सुद्धा नो कोर्सिव ॲक्शन, न्यायालयाने सांगितलेला आहे म्हणून बाहेर आहेत. चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आपण करू नका, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे.
Join Our WhatsApp Community