बेस्ट सेवा! ३१ डिसेंबरला ५० अतिरिक्त बस गाड्या प्रवाशांच्या सेवेत, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर…

133

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ३१ डिसेंबरला रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी फिरणाऱ्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध मार्गांवर रात्री एकूण ५० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अधिक गाड्या सोडण्यात येतील.

( हेही वाचा : बेस्ट बस चालकाला मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक!)

३१ डिसेंबरला ५० अतिरिक्त बसेस 

प्रवाशांच्या सोयीसाठी डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक ( पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या अतिरिक्त बसफेऱ्यांचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्याला असे आवाहन बेस्टमार्फत करण्यात आले आहे.

बसक्रमांक पासून पर्यंत बससंख्या वेळ ( रात्री)
८ मर्यादित डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ( म्युझियम) शिवाजी नगर टर्मिनस ३ एकमजली २२.००, २२.३०, २३.००
६६ मर्यादित – ” – राणी लक्ष्मीबाई चौक ( सायन) ४ एकमजली २२.००, २२.३०, २३.००, २३.००
ए-११६ – ” – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ४ एकमजली २२.३०, २२.४५, ००.१५, ००.३०
११६ – ” – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ४ एकमजली १७.००, १७.१५, १७.३०, १७.४५
ए- ११२ – ” – अहिल्याबाई होळकर चौक ( चर्चगेट) ४ एकमजली २२.००, २२.३०, २३.००, २३.३०
११२ – ” – अहिल्याबाई होळकर चौक ( चर्चगेट) ४ एकमजली १७.००, १७.१५, १७.३०, १७.४५
२०३ अंधेरी स्थानक ( प. ) जुहू बीच ७ एकमजली २३.००, २३.१५, २३.३०, २३.४५
२३१ सांताक्रुझ स्थानक ( प. ) जुहू बस स्थानक ५ एकमजली २२.००, २२.२०, २२.४५, २३.००
ए २४७ बोरीवली स्थानक ( प. ) गोराई बीच ५ एकमजली २२.००, २२.१५, २२.३०, २२.४५
ए २९४ गोराई बीच बोरीवली स्थानक (प.) ५ एकमजली २२.००, २२.१५, २२.३०, २२.४५
हेरिटेज बस डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक ( म्युझियम) विल्सन महाविद्यालय ४ दुमजली २३.००, २३.१५, २३.३०, २३.४५
२७१ मालाड स्थानक ( प.) मढ जेट्टी ४ एकमजली २२.००, २२.१५, २२.३०, २२.४५, २३.००, २३.१५
२७२ मालाड स्थानक ( प.) मार्वे बीच २ एकमजली २२.००, २२.१५, २२.३०, २२.४५, २३.००, २३.१५
एकूण बसेस ५०
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.