भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. ऋषभ पंतला अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी त्याला एअर अँब्युलन्सने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात बुधवारी आणण्यात आले. येथे थेट डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात ऋषभ पंतवर लिगामेंट सर्जरी होणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर होणार; भाजप कामगार संघटनेने केली महाव्यवस्थापकांसमवेत चर्चा )
ऋषभ पंत मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
दिल्लीहून डेहरादून येत असताना हम्मदपूरजवळ हा अपघात झाला. गाडी चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर डेहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र अपघातामुळे पंतला मोठ्या प्रमाणाच दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत. त्यामुळे पंतचा एमआरआय करता आला नाही. दरम्यान, पंतला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहे. चांगल्या उपचारांसाठी ऋषभ पंतला मुंबईला शिफ्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ऋषभला यातून सावरण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे. पुढील काही दिवस ऋषभ पंत मैदानावर दिसण्याची शक्यता नाही. क्रिकेटप्रेमी ऋषभ पंतसाठी प्रार्थना करत आहेत तर टीम इंडियानेही मंगळवारी ऋषभ पंतला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ ट्वीट केला होता.
Join Our WhatsApp Community