पराभवानंतर कोच राहुल द्रविडची BCCI कडे मोठी मागणी! म्हणाला, ‘आपल्या खेळाडूंना…’

123

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला. त्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे होत आहे. संपूर्ण विश्वचषकात उत्तम कामगिरी करणा-या भारतीय संघाला महत्वाच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागणे ही खूप खेदाची गोष्ट असल्याने यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा झाली आहे.

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचाः UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा)

काय म्हणाला द्रविड?

सध्या भारतीय क्रिकेट प्रणाली ही जगात सर्वोत्तम आहे. मात्र भारतीय खेळाडूंना आता विदेशी लीगमध्ये देखील खेळण्याची परवानगी देण्याची वेळ देण्यात आली आहे. खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्यास परवानगी मिळाल्यास त्याचा खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. मात्र याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी बीसीसीआयचा असेल, असे मत राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

भारतीय खेळाडूंना परवानगी नाही

सध्या भारतीय खेळाडूंना भारतातील आयपीएल सोडल्यास इतर कोणत्याही विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येत नाही. निवृत्त झालेले भारतीय खेळाडूच विदेशी लीगमध्ये क्रिकेट खेळू शकतात. त्यामुळे भारतीय खेळाडूंना विदेशातील खेळपट्ट्यांचा चांगला अभ्यास करता येत नाही. याउलट इतर देशांतील खेळाडू मात्र विविध देशांमधील व्यावसायिक क्रिकेट लीगमध्ये भाग घेत असतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.