बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी सामनाचा विशेष अग्रलेख; ‘बाळासाहेब स्वाभिमानाचा हिमालय’…

90

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी 10वा स्मृतीदिन आहे. ( Balasaheb thackeray Death Anniversary) सामनाच्या आजच्या अग्रलेखातून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. याचवेळी शिंदे गटावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश आजही भारावलेला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा फुटीर गट बेईमानी करुनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करतोय, हे ढोंग आहे, असे सामनात म्हणण्यात आले आहे.

बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. बाळासाहेब सगळ्यांचे होते, पण त्यांनी बेईमानीस कधीच थारा दिला नाही. लाखो निष्ठावान शिवसैनिक आज बाळासाहेबांचा जयजयकार करतील. त्यांच्या विचारांच्या पेटत्या मशालीसमोर नतमस्तक होतील. बाळासाहेब हे महाराष्ट्रात जन्मलेले स्वाभिमानाचे हिमालय होते. त्या हिमालयाच्या शिखरावर फक्त भगवाच आहे. जगाच्या इतिहासातील अमर महापुरुषांच्या श्रेणीत बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योद्धेपण इतिहासात अधिक तेजाने तळपत राहील, असे म्हणत आजच्या समानातून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यात आले आहे.

( हेही वाचा: राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो नव्हे, ‘भारत छोडो’ नाव द्या; मुख्यमंत्र्यांची टीका )

संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे नेतृत्व

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा 17 नोव्हेंबरला दहावा स्मृतिदिन आहे. संकाटांचे पहाड कोसळले तरी त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणारे त्यांचे नेतृत्व. अनेक वाद, वादळे आणि वावटळी त्यांनी अंगावर घेतल्या व परतवून लावल्या. मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ आणि त्याच्या ख-या कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट. त्यावेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीतही तेच घडले, असे म्हणत सामनातून बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाच्या उजव्या बाजू सांगितल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.