विविध वस्तूंच्या उत्पादनात टाटा समूह देशात अग्रेसर आहे. एअर इंडिया सारखी मोठी सरकारी कंपनी टाटा समूहाने खरेदी केल्यानंतर आता टाटा समूह आणखी एक मोठी कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देशभरात प्रसिद्ध असणा-या बिसलेरी(Bisleri) कंपनीला आता टाटा समूहाकडून खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी कराराची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा हा करार असू शकतो.
टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने बिसलेरी कंपनी विकत घेण्याचे ठरवले आहे. बिसलेरीचे प्रमुख रमेश चौहान यांनी देखील एका मुलाखतीत या दाव्याला पुष्टी दिली असून, बिसलेरीमधील हिस्सा विकण्यासाठी टाटा समूहाशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचाः येत्या 41 दिवसांत देशात होणार लाखो ‘शुभमंगलं’, खर्चाची यादी पाहून थक्कच व्हाल)
टाटा उद्योग समूहासह करार
तीन दशकांपूर्वी बिसलेरीने कोका-कोलासोबत करार करुन आपले शीतपेयांचे ब्रँड थम्स अप,गोल्ड स्पॉट आणि लिम्का यांचा करार केला होता. त्यानंतर आता कंपनी पिण्याच्या पाण्याचा ब्रँड टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकणार आहे. बिसलेरीचे सध्याचे व्यवस्थापन हे पुढील दोन वर्षांसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात येत असून, या करारामागील कारणही आता समोर येत आहे.
काय आहे करारामागचे कारण?
मीडिया रिपोर्टनुसार, बिसलेरीचे मालक उद्योगपती रमेश चौहान हे आता वयस्कर असून, ते 82 वर्षांचे आहेत. त्यामुळे सातत्याने त्यांची प्रकृती ठीक नसते. तसेच बिसलेरी ब्रँडचा विस्तार करण्यासाठी त्यांचा कोणीही उत्तराधिकारी नसून, त्यांची कन्या जयंती ही व्यवसायात फारशी उत्सुक नाही. त्यामुळे बिसलेरी टाटासोबत करार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः सर्वसामांन्यांना बसू शकतो वीज दरवाढीचा ‘शॉक’, महिन्याच्या बिलात होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ)
Join Our WhatsApp Community